शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला आहे. वीज बिलाची थकबाकी मागण्यासाठी म्हणून गेलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना चक्क डांबून ठेवण्यात आलेले असून पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही महिला अधिकाऱ्यांची सुटका केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , डेक्कन परिसरातील ही घटना असून बोधे नावाच्या एका कुटुंबाकडे थकबाकी असल्याकारणाने त्यांचा विजपुरवठा खंडित करण्यात आलेला होता. अवघ्या 5000 रुपयांची वीज बिल थकबाकी होती त्यामुळे हे बिल लवकर भरून टाका असे महिला अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले आणि त्यानंतर तुमचा वीज पुरवठा सुरळीत होईल असे महिला अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले मात्र बोधे कुटुंब यांनी करुणा आधारी आणि रूपाली कुटे या दोन्ही महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.
शासकीय कामकाज करत आरोपींनी त्यांना डांबून ठेवले आणि त्यानंतर चक्क त्यांच्या अंगावर श्वानदेखील सोडले. पोलिसांना याप्रकरणी फोन करण्यात आल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही महिला अधिकाऱ्यांची त्यानंतर सुटका केली. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये ललित बोधे आणि आरती बोधे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .