शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये पिंपरी इथे मागील भांडणाच्या कारणावरून चुलत भावाला बेदम मारहाण करत त्याच्यावर पिस्तूल रोखण्याचा प्रकार समोर आलेला असून शनिवारी 30 तारखेला चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 29 तारखेला रात्री दहाच्या सुमारास नारायण हाउसिंग सोसायटी मोरे वस्ती इथे ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुधीर भगवान मोरे ( वय 34 वर्ष ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून नीरज मोरे , मुन्ना तिवारी , यश राजेंद्र जाधव , सोन्या तिवारी सौरभ लक्ष्मण शिंदे, किशोर महारुद्र कोंडलकर ( सर्वजण राहणार चिखली ) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोदंवण्यात आलेला आहे.
आरोपी निरज आणि फिर्यादी सुधीर हे नात्याने चुलत भाऊ असून पूर्वीपासून त्यांच्यात वाद आहेत. 28 सप्टेंबर रोजी त्यांच्यात किरकोळ वाद झाला त्यानंतर समझोता देखील झाला मात्र तरी देखील आरोपी किशोर याने फिर्यादी सुधीर यांना फोन करून नारायण हाउसिंग सोसायटीत बोलावून घेतले आणि सुधीर तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांना लोखंडी रॉड, दगड तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. आरोपी नीरज याने कमरेला लावलेले पिस्तूल सुधीर यांना दाखवत भीती घातली असे देखील त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.