देशात दुर्दैवाने अनेक धार्मिक ठिकाणी आढळून येणारे संत बहुतांश प्रमाणात फसवणूक करून गुन्हेगारी करून आलेले असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून मुरेना पोलिसांनी या प्रकरणात एका साधूला अटक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला अटक करण्यासाठी पोलीस देखील चक्क भक्त बनून गेलेले होते. त्यांनी आरोपीच्या गळ्यात हार घातला आणि त्यानंतर आम्ही तुला तुम्हाला अटक करायला आलेलो आहोत असे सांगितले .
उपलब्ध माहितीनुसार , मध्यप्रदेशातील मुरेना येथील जमीन एका मंदिराच्या जमिनी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी या साधूला अटक करण्यात आलेली आहे. मंदिराला लागून दोन एकर जमीन आहे आणि त्यावर दुकाने आहेत. दुकानदारांकडून भाडे वसूल करण्यासाठी आरोपी असलेला साधू रामशरण आणि त्याचा एक साथीदार दानबिहारी या दोघांनी मिळून बोगस ट्रस्ट तयार करण्याची योजना आखली होती.
साधू असणारा राम शरण याने गौरा खुर्द गावचा माजी सरपंच सुरेंद्र यादव आणि अशोक यादव यांना देखील त्यात सहभागी करून घेतले आणि बोगस ट्रस्ट स्थापन करून त्याच्या पावत्या देखील छापल्या आणि या पावत्याच्या माध्यमातून दुकानदारांकडून भाडे वसूल करायला त्यांनी सुरुवात केली. मंदिराचे मुख्य महंत मदन मोहन यांना याबद्दल समजले त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तीन नोव्हेंबर 2021 रोजी साधू रामशरण , दानबिहारी , सुरेंद्र यादव आणि अशोक यादव या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला मात्र राम शरण हा तोपर्यंत फरार झालेला होता.
रामशरण अखेर उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रामजानकी मंदिर आश्रमात राहू लागला आणि वकिलांच्या माध्यमातून त्याने अटकपूर्व जामीनासाठी देखील अर्ज केला मात्र त्यांचा अर्ज त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि पोलिसांना न्यायालयाने आरोपीस तात्काळ हजर करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मथुराच्या एसपींना कल्पना दिली. मध्यप्रदेश पोलीस मथुरा पोहचले त्यानंतर पोलिसांनी वेशभूषा बदलली आणि आपण जणू त्यांचे भक्त आहोत असे भासवत सुरुवातीला त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि कानात ‘ मोरेना पोलीस ठाण्यातून आलेलो आहोत तुम्हाला अटक करायचे आहे ‘ असे सांगितले त्यानंतर रामशरण हा पोलिसांसोबत जाण्यास तयार झाला आणि त्याला अटक करून पोलीस मध्य प्रदेशाच्या दिशेने निघाले.