सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आपल्या समस्येवर तोडगा विचारण्यासाठी एका ज्योतिषाकडे गेल्यानंतर ज्योतिषाने त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आतापर्यंतच्या तपासात सुरुवातीला दोन्ही मुलांनी त्याच्याकडे चोरी केली असा आरोप त्यांच्यावर होता मात्र पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आल्याने आरोपी ज्योतिषाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , उत्तर प्रदेशातील कानपूर येथील गोविंदनगर परिसरात ही घटना घडलेली असून प्रेयसीचा रुसवा दूर कसा करायचा असे विचारणा करत दोन तरुण ज्योतिषाच्या घरात शिरलेले होते. ज्योतिषाला त्यांनी आपली व्यथा सांगितल्यानंतर दोन्ही मुलांनी कोल्ड्रिंकच्या माध्यमातून आपल्याला गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर ते चोरी करून फरार झाले अशी तक्रार शर्मा नावाच्या एका ज्योतिषाने पोलिसात दिलेली होती.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि सुरुवातीला इंस्टाग्रामवर एक रील्स पाहिले त्यामध्ये हॉटेलच्या बेडवर नोटांची बंडलं दिसत होती त्यावरून हा व्हिडिओ कुठून अपलोड करण्यात आलेला आहे याची माहिती हाती आल्यानंतर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले मात्र त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून पोलीसदेखील चकित झाले तर ज्या ज्योतिषाच्या घरात चोरी झाली त्याने सांगितलेला घटनाक्रम संपूर्णपणे वेगळा आढळून आला.
अल्पवयीन मुलांनी दिलेल्या सांगितल्याप्रमाणे आम्ही आमची समस्या घेऊन ज्योतिषी असलेला तरुण शर्मा याच्याकडे पोहोचलेलो होतो. आम्हाला आमच्या समस्येवर तोडगा हवा होता मात्र ज्योतिषी तरुण शर्मा याने एकाच रात्री आमच्या दोघांसोबत जबरदस्तीने समलैंगिक संबंध ठेवले. आम्ही विरोध केला तर तुम्हाला भस्म करून टाकीन अशी देखील त्याने धमकी दिली त्यानंतर आम्ही घाबरून गेलो आणि त्याला विरोध केला नाही असे या मुलांनी सांगितलेले आहे.
मुलांच्या म्हणण्यानुसार , आरोपीने आमच्यावर अत्याचार केल्यानंतर तो झोपी गेला त्यानंतर आम्ही दोघांनी बदला घेण्यासाठी त्याच्या घरातील तिजोरी फोडली आणि तिथून पसार झालो. पोलिसांनी त्यानंतर ज्योतिषी असलेला तरुण शर्मा याला अटक केलेली असून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे .