प्रेयसीपासून सुटका मिळवण्यासाठी ‘ विचित्र ‘ प्रकार आला अंगलट , गाडीतच पकडलं अन..

Spread the love

सातत्याने मानसिक त्रास देणाऱ्या प्रेयसीपासून सुटका मिळावी म्हणून कोण काय शक्कल लढवेल याचा काही भरवसा राहिलेला नाही असाच एक प्रकार ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा इथे समोर आलेला असून एका तरुणाने दुसरीकडे अफेअर सुरू झाल्यानंतर पहिल्या मैत्रिणीपासून सुटका मिळवण्यासाठी चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचलेला होता मात्र त्याचा हा बनाव उघडकीस आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पॉल येरानाव असे या 35 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला फोन करून आपण फायनान्स एजंटला भेटण्यासाठी जात आहोत असे सांगितले आणि प्रत्यक्षात दुसऱ्या मैत्रिणीकडे जाऊन पोहोचला. 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाची पार्टी होती त्यावेळी त्याच्या दुसऱ्या मैत्रिणीने विचित्र तमाशा केला. त्याची पहिली गर्लफ्रेंड हिला दोघांनी मिळून मेसेज केला त्यामध्ये ‘ पॉलला आमच्याकडे पाठवल्याबद्दल धन्यवाद आम्ही त्याला उद्या सकाळी सोडू जेव्हा तो आम्हाला त्याची बाईक देईल ‘ असे या मेसेजमध्ये म्हटलेले होते.

पहिल्या मैत्रिणीला मेसेज केल्यानंतर पॉल आणि त्याची दुसरी मैत्रीण हे बिनधास्त झाले आणि आता आपल्या प्रेमसंबंधात कोणी अडचण ठरणार नाही याची त्यांना खात्री झाली मात्र हा प्लॅन त्यांच्या चांगलाच अंगलट आला आणि पॉल याची पहिली मैत्रीण हिला हा मेसेज मिळाल्यानंतर तिने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी तात्काळ त्याच्या शोधासाठी एक टीम तयार केली.

एक जानेवारी रोजी पोलिसांनी एका गाडीला थांबवलं त्यामध्ये पॉल आढळून आला आणि त्याच्यासोबत त्याची दुसरी मैत्रीण देखील आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली त्यावेळी दोघेही भांबावून गेले आणि पोलिसांनी अखेर त्यांना पकडले. त्यांनी अखेर हा प्रकार आपण का केला हे देखील पोलिसांना सांगून टाकले. बारा दिवसांनी पॉललाअटक करण्यात आली आणि सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली मात्र त्यानंतर त्याने आपण हा सर्व प्रकार गर्लफ्रेंडला फसवण्यासाठी केलेला होता याची कबुली दिली त्यानंतर त्याला 350 तासांची सामाजिक सेवेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे .


Spread the love