महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या कल्याण शहरात समोर आलेले असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्या पार्टनरने चाकूने वार करत हत्या केलेली आहे. कल्याणच्या पूर्व परिसरातील विजयनगर येथील आमराई परिसरात ही घटना घडलेली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून आरोपीस ताब्यात घेतलेले आहे .
उपलब्ध माहितीनुसार , रसिका कोळंबेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिचा प्रियकर असलेला विजय जाधव याला पोलिसांनी अटक केलेली आहे . विजय हा सातत्याने रसिका हिच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा आणि त्यातून त्यांच्यात वाद होत होते . विजय याने रसिका हिची हत्या केल्याचे समोर आलेले असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
विजयनगर येथील आमराई परिसरात आरोपी विजय जाधव आणि रसिका कोळंबेकर हे गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्याने रसिका हिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केले त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले. काल सकाळच्या सुमारास वाद झाल्यानंतर संतापलेल्या विजयने रसिका हिच्यावर चाकूने हल्ला केला आणि दवाखान्यात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले . रसिका हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आलेला आहे.