पुण्यामध्ये सद्य परिस्थितीत ऑनलाइन फसवणूक तसेच ओळख बनवल्यानंतर होणारी फसवणूक याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून लोणावळ्यात ऑनलाईन फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आलेला आहे . एका ज्येष्ठ नागरिकाला तुम्ही लाईट बिल कसे भरता असे विचारत गुगल पे वरून बँक खात्याची माहिती मिळवत 97 हजार रुपये आरोपीने लंपास केलेले आहेत. वलवण गावात राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाने लोणावळा शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गांधी जयंतीच्या दिवशी एका ज्येष्ठ नागरिकाला फोन आला त्यामध्ये तुम्ही लाईट बिल कसे भरता . तुमचे लाईट बिल थकलेले आहे ते तुम्ही तात्काळ भरून टाका , असे सांगत तक्रारदार व्यक्ती यांच्या बँक खात्याची आरोपीने माहिती मिळवली . आरोपीने त्यानंतर गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही बिल भरता असे सांगत शंभर रुपये तुम्ही पाठवून बघा असे सांगितले.
तक्रारदार यांनी वेगवेगळ्या बँकेतून प्रत्येकी शंभर रुपये पाठवले मात्र दोन्ही ट्रांजेक्शन फेल झाले. दरम्यानच्या काळात तक्रारदार व्यक्ती यांनी आपल्या खात्याची माहिती घेतली असता त्यामधून 97,727 रुपये गायब झाल्याची माहिती समजली त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि बँकेला देखील या प्रकरणी माहिती दिली असून पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.