महाराष्ट्रात एक अजब प्रकरण सध्या नागपूरमध्ये चर्चेत आलेले असून बँकेत जर खाते उघडले तर दर महिन्याला दहा हजार रुपये तुम्हाला मिळतील अशा स्वरूपाची सध्या केंद्र सरकारची स्कीम आहे अशी माहिती दिल्यानंतर एका व्यक्तीच्या नावाने चार बँकेत खाते उघडण्यात आले आणि त्यानंतर दोन भावांनी मिळून त्या खात्यात दोन कोटी रुपयांचा व्यवहार केला. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी एका भावाला अटक केली असून एक भाऊ मात्र फरार आहे.
उपलब्ध माहितीनुसार , बबलू राजकुमार जाधव ( वय 28 ) आणि निखिल जाधव ( वय 26 ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून त्यातील बबलू याला अटक करण्यात आलेली आहे . मोहन दोडेवार असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून दोन्ही भावांनी मोहन यांच्यासोबत असलेल्या नात्याचा फायदा घेत त्यांच्या नावावर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत खाते उघडले आणि दोन कोटी रुपयांचा व्यवहार केला. आपल्या खात्यात दोन कोटी रुपये आहेत याची त्यांना काही कल्पनाच नव्हती आणि नेहमीप्रमाणे ते रोजंदारीवर कामाला जायचे. मेसेज आल्यानंतर हा प्रकार समोर आलेला असून त्यानंतर त्यांनी माहिती घेतली त्यावेळी भावांचा कारनामा समोर आलेला आहे .