सोशल मीडियावर सध्या एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आरोपी हे मूळचे इंग्लंडमधील डर्बी शायर येथील आहेत . मूळची भारतीय असलेली रमनदीप कौर हिला तिच्या पतीच्या हत्येबद्दल उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. रमनदीप कौर हिचा प्रियकर गुरुप्रीत सिंग याला देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रमनदीप हिने तिचा पती सुखजित सिंग याची हत्या केली होती आणि या प्रकरणातील तिचा प्रियकर गुरुप्रीत याने तिला साथ दिली. उत्तर प्रदेशातील सुखजित सिंग हा ड्रायव्हर काम करण्यासाठी इंग्लंड इथे गेलेला होता याच दरम्यान त्याची डर्बीशायर येथील रमनदीप कौर हिच्यासोबत ओळख झाली आणि ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यानंतर सुखदीप याने युकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी रमणदीप हिच्यासोबत लग्न केले.
रमणदीप हिला दरम्यानच्या काळात अमली पदार्थ आणि शारीरिक सुख मिळवण्याची चटक लागली होती त्यानंतर काही दिवसात पती-पत्नीत वाद होऊ लागले आणि रमनदीप ही त्याच्यावर नाराज होऊ लागली. सातत्याने रमणदीप ही त्याला त्याच्या दाढीबद्दल तसेच ड्रेसिंग स्टाईलबद्दल सतत चिडवत असायची आणि दाढी काढण्याविषयी देखील त्याला जबरदस्ती करायची.
दरम्यानच्या काळात सुखजित याचा लहानपणचा मित्र गुरुप्रीत हा कामासाठी युकेला गेला आणि त्यानंतरत्याच्या घरी येऊ लागला . शारीरिक सुखासाठी चटावलेल्या रमणदीप हिने त्याला हेरले. सुखजित कामासाठी गेला की रमणदीप आणि गुरुप्रीत हे शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेल्या रमणदीप हिने पतीचा अडथळा नको म्हणून त्याची हत्या करण्याचा प्लॅन केला. 2016 मध्ये पती आणि दोन मुलांसह ती उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर इथे आली आणि एक सप्टेंबर 2016 रोजी रात्री बिर्याणी तयार केली त्यामध्ये विष मिसळले आणि पती आणि दोन्ही मुलांना तसेच दोन्ही कुत्र्यांना देखील दिली .
अवघ्या काही तासात कुत्र्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पती सुखजित आणि एक मुलगा बेशुद्ध झाला मात्र एका मुलाने बिर्याणी खाल्लेली नव्हती . सुखजित बेशुद्ध असल्याचे समजल्यानंतर पत्नीने त्याचा चेहरा उशीने दाबला आणि गुरुप्रीत याने त्याच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सुखजित याच्या दोन्ही मुलांना सध्या इंग्लंडमध्ये त्यांच्या मावशीकडे पाठवण्यात आलेले असून रमनदीप आणि तिचा प्रियकर गुरुप्रीत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आजतकने यासंदर्भात वृत्त दिलेले आहे.