रात्री महिलेच्या हॉटेलवर येऊन दोन भावांची दमदाटी , म्हणाले आत्ताच्या आता ..

Spread the love

एक अजब प्रकार सध्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात समोर आलेला असून हॉटेलमध्ये खाण्यास काही शिल्लक नाही असे सांगितल्याने ‘ तू आम्हाला खाण्यास का देत नाही ? ‘ असे म्हणत दोन भावांनी मिळून हॉटेलचालक असलेल्या महिलेला शिवीगाळ करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केलेला आहे. जर पोलिसात तक्रार दिली तर जिवे मारण्याची देखील आरोपींनी तिला धमकी दिली. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सांगोला तालुक्यात एका हॉटेलवर ही घटना घडलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार फिर्यादी महिला यांचे सांगोला तालुक्यात एका रोडवर हॉटेल आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पती-पत्नी हॉटेलमध्ये असताना आरोपी शिंगू महादेव हजारे आणि त्याचा भाऊ राजू महादेव हजारे हे दोघे तिथे आले आणि आम्हाला काहीतरी खायला द्या असे म्हणू लागले. रात्री साडेदहाची वेळ असल्याकारणाने आता काही देऊ शकत नाही हॉटेलमध्ये काही नाही असे महिलेने त्यांना सांगितले मात्र आरोपींचे समाधान झाले नाही.

आरोपी शिंगू हजारे याने महिलेला तू आम्हाला खायला का देत नाही असे म्हणत टेबलावरील पाण्याने भरलेला जार खाली उतरून दिला आणि मोकळा झालेला जार महिलेच्या पाठीत मारून शिवीगाळ करू लागला तर त्याचा भाऊ राजू याने देखील महिलेच्या कानाखाली वाजवली आणि तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. स्त्री मनाला वाईट वाटेल अशा स्वरूपात आरोपींनी शिवीगाळ केली. महिलेचा पती पत्नीला वाचवण्यासाठी मध्ये आला त्यावेळी आरोपी राजू हजारे याने त्यांना मारहाण केली सोबतच तुम्ही आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी देखील त्यांनी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटलेले आहे.


Spread the love