पुण्यातील पिंपरी चिंचवड इथे ऑनलाइन गेम खेळून करोडपती झालेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या मागे आता चौकशीचा ससेमीरा लागणार असून करोडपती झालेल्या या व्यक्तीने ऑनलाईन गेम खेळण्याचे समर्थन केले म्हणून त्यांची चौकशी आणि चर्चा सुरू झालेली आहे. कोट्यावधी रुपये जिंकल्याचा त्यांचा आनंद क्षणिकच ठरलेला आहे.
सोमनाथ झेंडे हे पोलीस दलात कार्यरत असून सरकारी कर्मचारी आहेत अशा परिस्थितीत ऑनलाईन गेम खेळल्यावर कोट्यावधी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून त्यांना मिळाली मात्र सरकारी अधिकारी असल्याकारणाने त्यांना अशा पद्धतीने ऑनलाईन गेम खेळण्याची परवानगी आहे का ? ऑनलाइन गेममुळे याआधी अनेक जणांनी आत्महत्या देखील केलेल्या असून त्यांनी चक्क गणवेश परिधान करून या संदर्भात मुलाखत देखील दिलेली होती त्यामुळे वादात आणखीनच भर पडलेली आहे.
भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस उपनिरीक्षक असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन गेम खेळून एक प्रकारे जुगाराचे उदात्तीकरण केलेले आहे असा ठपका त्यांच्यावर ठेवलेला आहे. सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई होणार आहे की नाही हे अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाही. ऑनलाइन गेममुळे आत्तापर्यंत अनेक जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशा परिस्थितीत कायदेशीर बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे संकेत सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेले आहेत.