लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार सध्या चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलेला असून शेतजमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करण्यासाठी तडजोड करत दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुय्यम निबंधक यास रंगेहाथ अटक केलेली आहे . विशेष म्हणजे अटक केलेली व्यक्ती ही महिला असून वैशाली मिटकरी असे त्यांचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार , 12 ऑक्टोबर रोजी आरोपी महिलेने दहा हजार रुपयांची लाच रंगेहाथ घेतलेली होती त्यावेळी पथकाने कारवाई करत तिला ताब्यात घेतलेले आहे . मुल गावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात वैशाली मिटकरी या कार्यरत होत्या.
तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री नंबर वर संपर्क केला त्यानंतर तक्रारीत शहानिशा असल्याचे आढळून आल्यानंतर पथकाने सापळा रचलेला होता. रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले असून पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.