देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण पंजाबमधील अमृतसर इथे समोर आलेले असून नात्याने आत्या असणाऱ्या एका महिलेने चक्क तिच्या अल्पवयीन भाचीला तिच्या प्रियकराच्या मित्राच्या स्वाधीन करत केले आणि त्यानंतर आरोपीने तिच्या अल्पवयीन भाचीवर अत्याचार केलेला आहे त्यानंतर या आत्याने अल्पवयीन मुलीवर मुलीसोबत देखील शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आलेला असून पीडित मुलीच्या आत्यासोबत तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमृतसर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , तरणतारण येथील ही घटना असून तक्रारदार मुलीचे वय अवघे पंधरा वर्षे आहे. तीन ऑक्टोबर रोजी मुलगी तिच्या आतेभावांना भेटण्यासाठी अमृतसर इथे गेली होती त्यावेळी घरी आत्या एकटीच होती त्यानंतर या आत्याने तिला आपण अमृतसरला गुरुद्वारला जाऊ असे सांगत सोबत घेतले आणि गुरुद्वारला घेऊन न जाता चक्क एका लॉजवर घेऊन गेली. तिथे आत्याचा प्रियकर असलेला आर्षदीप सिंह आणि त्याचा मित्र आकाशदीप आधीच येऊन थांबलेले होते.
अल्पवयीन मुलीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालील वाळूच सरकली . घाबरून गेल्यानंतर आत्याने तिच्यावर जबरदस्ती सुरू केली. एका बेडवर आत्याने तिचा प्रियकर असलेला आकाशदीप सिंह यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तर दुसऱ्या बेडवर चक्क या अल्पवयीन मुलीला आर्षदिप याच्या स्वाधीन केले.
भाचीवर बलात्कार होत असल्याचे आत्या उघड्या डोळ्यांनी पाहत होती मात्र तरीदेखील तिने त्याला कुठलाही विरोध केला नाही उलट भाचीला झाला प्रकार कुणाला सांगशील तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. आत्यासोबत पुन्हा घरी आल्यानंतर पीडित मुलगी गप्प राहत होती म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिला याबद्दल माहिती विचारली तेव्हा तिने हा प्रकार सांगितलेला आहे. पोलिसांनी सध्या तिची आत्या राजकौर , आकाशदीप सिंग आणि आर्ष दीप सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.