शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक पुन्हा प्रकार पिंपरीत समोर आलेला आहे . दारूच्या नशेत मित्रांनी मित्रावर वार करत त्याची हत्या केल्याचा प्रकार पिंपरीत समोर आलेला असून घटनेमागचे कारण म्हणजे दारूच्या नशेत केलेली बडबड हे समोर आलेले आहे. आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे.
पिंपरी चिंचवड येथील हा प्रकार असून सुरज उर्फ जंजीर कांबळे असे मयत तरुणाचे नाव आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सुरज आणि त्याचे मित्र पंकज पाचपिंडे आणि अमरदीप उर्फ लखन जोगदंड हे भेटले होते. तिन्ही मित्र भेटल्यानंतर त्यांनी एकत्र दारू आणली आणि दारू पिण्यास सुरू केले. दारू पीत असताना त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या त्यावेळी मयत सुरज याने संतापाच्या भरात दारूच्या नशेत पंकज आणि अमरदीप यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. पंकज आणि अमरदीप यांचा संयम अखेर तुटला आणि अमरदीप याने रागाच्या भरात सुरजच्या गळ्यावर चाकूने वार केले .
नशा उतरल्यानंतर आपल्याकडून खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले मात्र तोपर्यंत सुरज याचा मृत्यू झालेला होता. दोन्ही आरोपींनी त्यानंतर त्याचा मृतदेह एक कपड्यात गुंडाळला आणि बावधन येथील नाल्यात फेकून दिलेला होता. जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात दोन्ही आरोपी इथून निघून गेले आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या मूळ गावी जाऊन लपले. सुरज याच्या कुटुंबियांनी तो घरी आला नाही म्हणून पोलिसात तक्रार दिली त्यानंतर सुरज याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे.