प्रेमासाठी कोण काय करेल याचा काही भरवसा राहिलेला नाही . अशीच एक घटना बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यात समोर आली आहे .एक विवाहित प्रियकर रात्रीच्या वेळी त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी सुमारे तीन तास गावातील सगळ्यांचाच वीजपुरवठा खंडित करायचा आणि अंधार झाला की मोबाईलमध्ये लाईट लावून प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचा. बरेच दिवस ठराविक वेळेलाच लाईट जात असल्याने लोक वायरमनला त्रास द्यायचे मात्र अखेर गावकऱयांनी या प्रकाराचा शोध घेतला आणि वायरमन हाच हा उद्योग करत असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकार हा कृत्यानंदनगर ठाण्याच्या परिसरातील गणेशपूर पंचायत येथे घडत होता. वायरमन सुरेंद्र राय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी दररोज तीन तास गावातील वीजपुरवठा खंडित करायचा. लोकांना त्याच्यावर संशय येताच त्यांनी अंधारात त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरु केले अन ग्रामस्थांनी सुरेंद्रला त्याच्या प्रेयसीसह मौजमजा करत असताना रंगेहात पकडले. संतप्त झालेल्या लोकांनी या दोघांनाही चपलांचे हार घातले आणि दोघांचेही मुंडण करून त्यांना गावभर फिरवले मात्र अखेर त्यांच्या प्रेमापुढे गावकऱ्यांनी हार मानली आणि त्यांचे लग्न लावून दिले.
परोरा गावातील वायरमन सुरेंद्र राय आणि डहेरिया आदिवासी टोला येथील एक आदिवासी तरुणी यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. गावात बोभाटा होऊ नये म्हणून तो जेव्हा तिला भेटायला जायचे असेल तेव्हा सुमारे तीन तास डहेरिया गावातील वीजपुरवठा तीन तासांसाठी खंडित करायचा आणि एका तिला भेटून आला कि गावातील वीजपुरवठा सुरळीत व्हायचा. रोज ठराविक वेळेलाच हा प्रकार होत असल्याने ग्रामस्थांनी या प्रकारचा छडा लावायचे ठरवले.
एके दिवशी वीजपुरठा खंडित झाल्याबरोबर ग्रामस्थांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. आधी त्यांना मारहाण केली. त्यानंतर चपलांच्या माळा घालून नंतर त्यांचे लग्नही लावून दिले. प्रियकर हा विवाहित होता आणि एकदा वीजपुरवठा खंडित केला कि मग दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत प्रेयसीकडे जायचा. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते अशीही माहिती समोर आली आहे .