उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीला मोठ्या प्रमाणावर मिळणारा पाठिंबा ही भाजपची मुख्य डोकेदुखी झालेली आहे. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून अगदी किरकोळ निवडणुकीला देखील प्रचार करणारे मोदी उत्तर प्रदेश निवडणुकीत मात्र स्टार प्रचारक म्हणून भूमिका बजावणार नाहीत . उत्तर प्रदेश मध्ये भाजपची सत्ता येण्याची चिन्हे कमीच आहेत त्यामुळे मोदी यांनी प्रचार केल्यानंतर अपयश हाती लागले तर मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागू शकते तसेच इतर ठिकाणीदेखील त्याचे परिणाम भाजपला दिसून येतील म्हणून मोदी यांची ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार संपण्यास केवळ दहा दिवस उरलेले आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप तिथे प्रचार देखील सुरू केलेला नाही. भाजपच्या नेत्यांना गावागावातून पिटाळून लावत असल्याच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत अर्थात गोदी मीडिया या बातम्या दाखवत नाहीत तर सोशल मीडियावर अशा प्रकारांची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उत्तर प्रदेशात दारोदार फिरून मध्ये मागत आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देखील जोरदार प्रचार करत आहेत मात्र मोदी या प्रचारापासून अलिप्त पाहायला मिळत आहेत.
2017 साली उत्तरप्रदेशात भाजपला तीन चतुर्थांश बहुमत मिळाले होते. मोदी यांच्याकडे पाहून नागरिकांनी भरभरून मते दिली मात्र जनतेचा मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झालेला आहे. कोरोना काळात उत्तर प्रदेशातील नागरिकांचे अचानक घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयानंतर झालेले हाल जनता अद्याप विसरलेली नाही तसेच पश्चिम बंगाल येथे देखील मोदी कार्ड सपशेल फ्लॉप ठरलेले होते त्यामुळे यावेळी पक्षाने मोदी यांना उत्तर प्रदेशातून दूरच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगालची आकडेवारी पाहायची झाली तर विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी 26 प्रचार सभा घेतल्या होत्या त्यातील भाजपने लढवलेल्या 294 जागांपैकी फक्त ७२ ठिकाणीच भाजपला विजय मिळवता आला तर त्याआधी दिल्ली येथे विधानसभा निवडणुकीत देखील जोरदार प्रचार करून मोदी यांच्या नेतृत्वाला मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला होता.