भाजपला मतदान केले म्हणून पतीने काढले घराबाहेर ?

Spread the love

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला विक्रमी असे यश मिळाले मात्र त्यानंतर देखील मतदान कोणाला केले यावरून अनेक कुटुंबात देखील किरकोळ वाद निर्माण झालेले आहेत अशात एका घटनेत पत्नीला मारहाण करून एका मुस्लिम महिलेला घरातून हाकलून देण्यात आले होते त्यामुळे तिच्या पतीवर कडक कारवाई करावी, असे राष्ट्रीय महिला आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना म्हटले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पतीने त्याच्या पसंतीच्या राजकीय पक्षाला पत्नीने मत दिले नाही म्हणून तिला घरातून हाकलून दिले, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे. जर पतीवरील हे आरोप खरे आढळले तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे देखील आयोगाने म्हटले आहे.

आयोगाने पुढे म्हटले की, राज्यातील बरेली येथे ही घटना घडली असून भाजपला मतदान केले म्हणून तिच्या पतीने मारहाण करून तिला घरातून हाकलून दिले होते, अशी बातमी अनेक ठिकाणी झालेली आहे तर त्या महिलेला तिच्या पतीने घटस्फोट देण्याची देखील धमकी दिली होती तरी सदर प्रकरणी या पतीवर कडक कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.


Spread the love