खुशखबर..पेट्रोल २५ रुपये अन डिझेल २० रुपये स्वस्त फक्त

Spread the love

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र व काही राज्य सरकारची करात कपात करण्याची घोषणा जनतेला भावलेली नाही कारण याने पेट्रोल डिझेलचे भाव अत्यल्प प्रमाणातच कमी झालेले आहेत. नागरिकांच्या आर्थिक अडचणीत अद्यापही पेट्रोल डिझेल आणि गॅस हीच मुख्य अडचण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे जसे बिहार येथील नागरिक चक्क नेपाळला जाऊन आता पेट्रोल भरून येत आहेत. मोदी यांच्या अपयशी विदेश नीतीने ज्या नेपाळची आर्थिक अडवणूक करून त्यांना चीनच्या जवळ जाण्यास भाग पडले त्याच नेपाळमध्ये आज भारतीय लोकांना कमी दरात पेट्रोल घेऊन यावे लागत आहे .

नेपाळ सीमेला लागून असलेल्या बिहारमधील रक्सौलमध्ये पेट्रोलचा दर 107 रुपये 92 पैसे आणि डिझेलचा दर 92 रुपये 98 पैसे प्रति लिटर आहे. रक्सौलमधील पेट्रोल आणि डिझेलचे हे दर किरकोळ कर सवलतीनंतरचे आहेत मात्र बिहारच्या दृष्टीने आजही नेपाळमध्ये पेट्रोल 25 रुपये 17 पैशांनी आणि डिझेल 20 रुपये 95 पैशांनी स्वस्त आहे त्यामुळे बिहार येथील नागरिक चक्क नेपाळला जाऊन टाकी फुल करून येत आहेत.

रक्सौलला लागून असलेल्या नेपाळच्या पारसा जिल्ह्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 132.25 नेपाळी रुपये किंवा 82.65 भारतीय रुपये आहे. त्याचप्रमाणे डिझेलची किंमत देखील 115.25 नेपाळी रुपये किंवा 72.03 भारतीय रुपये प्रति लिटर आहे. बिहार आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात भारतीय रुपया व्यवहारात चलनात असल्याने बिहारच्या नागरिकांना याचा मोठा फायदा होत आहे.


Spread the love