जॅकलीन फर्नांडिसला देखील आपल्या जाळ्यात ओढणारा सुकेश चंद्रशेखर कोण ?

बॉलीवूडमधील जॅकलीन फर्नांडिस तसेच नोरा फतेही यांना अडचणीत आणणारा सुकेश चंद्रशेखर हा नक्की कोण आहे याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून आज आम्ही आपल्याला सुकेश चंद्रशेखर याच्याबद्दल अधिक माहिती देणार आहोत. लोकांना उल्लू बनवून लुटणे हा याचा मुख्य धंदा असून अनेक जणांना गंडा घालून हसवणारा सुकेश हा केवळ 12 वी उत्तीर्ण आहे. याच मार्गाने तो करोडपती झालेला असून सध्या तो तिहार येथील तुरुंगात आहे.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर ?

सुकेश चंद्रशेखर हा मूळचा कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील असून त्याचे वडील विजयन चंद्रशेखर यांची मुलाने खूप शिकून मोठे व्हावे अशी इच्छा होती मात्र तो बारावीपर्यंत शिकला आणि त्यानंतर लोकांना लुटून मोठा झाला. बारावीनंतर त्याने रिअल इस्टेट क्षेत्रात काम सुरू केले. त्याला महागड्या गाड्या वापरण्याचा छंद होता त्यातून त्याने कारच्या शर्यती आयोजित करण्यास सुरुवात केली.

सतराव्या वर्षी 2007 मध्ये त्याला पहिल्यांदा अटक झाली त्यावेळी तो अनेक जणांना फोन करून वरिष्ठ सरकारी अधिकारी आपण आहोत असे भासवत असायचा. बंगळुरु विकास प्राधिकरणात तुमची कामे करून देऊ असे सांगत सज्ञान होईपर्यंत त्याने तब्बल 100 हून अधिक लोकांना फसवलेले होते. फसवणुकीसाठी सर्वात सर्वाधिक गरजेचा असलेला गुण म्हणजे गोड बोलणे तो त्याच्याकडे होता त्यातून त्याने हा सर्व प्रकार केला.

पैसेवाले लोक जे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत अशा लोकांना सुकेशा सर्वप्रथम शोधायचा आणि आपण वरिष्ठ अधिकारी आहोत असे सांगत तुमचे काम करून देऊ असे सांगत त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा . त्यांची यातून सुटका करण्यासाठी त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना पार्टीत तसेच आर्थिक लालूच देऊन तो तक्रार कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकजणांना मदतही करायचा अशाच पद्धतीने त्याने गृहमंत्री चक्क अमित शाह यांच्या नावाचा वापर करत जॅकलीन फर्नांडिस हिला आपल्या जाळ्यात ओढले होते.