‘ रामसेतू ‘ ला उतरती कळा , अक्षयकुमारचे करिअर धोक्यात

अक्षय कुमारचा बहुचर्चित असलेला चित्रपट रामसेतू हा 25 ऑक्टोबरला प्रसिद्ध प्रदर्शित झालेला असून या चित्रपटाला अपेक्षित असा प्रतिसाद दिसून येत नाही. पहिल्या दिवशी जोरदार कलेक्शन झाल्यानंतर कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली असून चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. रामसेतू चित्रपटाच्या पहिल्या दिवशी पंधरा कोटी रुपयांची कमाई झाली त्यानंतर हा चित्रपट पुढे चांगला प्रतिसाद मिळेल चांगला चालेल अशी अपेक्षा होती मात्र आता चित्र बदलले पाहायला आढळून येत आहे. दुसऱ्या दिवशी 11 कोटी तर तिसर्‍या दिवशी आठ कोटी 20 लाख रुपये कमाई झाली मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर ही कमाई अत्यल्प असून चित्रपट लोकांची चित्रपट गर्दी खेचण्यात कमी पडलेला आहे.

अभिनेता अक्षय कुमार याच्या लोकप्रियतेला गेल्या काही वर्षात लागलेली दिसून येत असून ओहोटी लागलेली दिसून येत असून मूळचा कॅनडाचा नागरिक असलेला अक्षयकुमार याचे चित्रपट गेल्या काही वर्षात अपयशी राहिलेले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता रामसेतू चित्रपट शंभर कोटींपर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता दिसून येत नसल्याने बॉलिवूडचे धाबे दणाणले आहे.

भाजप सत्तेत आल्यानंतर केवळ सत्ताधारी नेत्यांना खूश करण्यासाठी बॉलीवूडकडून निव्वळ ड्रामेबाज आणि अर्धवट माहितीवर चित्रपट बनवले जात असून या चित्रपटांशी नागरिकांना काहीच घेणे-देणे राहिले नसल्याचे दिसून येत आहे. काही कोटींची गुंतवणूक करून हे चित्रपट बनवले जातात मात्र त्यामध्ये लोकांना आपल्यासोबत जोडणारी कुठलीच गोष्ट दिसून येत नसल्याने केवळ प्रपोगंडा म्हणून बनवलेले हे चित्रपट पाहण्यासाठी नागरिक चित्रपटगृहाकडे फिरकतही नाहीत असे गेल्या काही वर्षात दिसून येत आहे.