‘ ते माझे पाळीव कबुतर ‘ , राजेश्वरीचे चाहत्याला भन्नाट उत्तर

फॅन्ड्री चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या चाहत्यांसाठी फेसबुकवर शेअर करते. तिच्या या फोटो आणि व्हिडिओवर अनेक जणांच्या कॉमेंटदेखील येतात त्यामध्ये तिचे कौतुकही केले जाते आणि क्वचितप्रसंगी तिच्या फोटोवर चाहते आपले मत देखील व्यक्त करतात.

राजेश्वरी खरात हिने काही दिवसांपूर्वी एका टेरेसवर डान्स करत आपला व्हिडीओ फेसबुकला टाकला होता. सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स देखील आल्या . राजेश्वरी डान्स करत असताना टेरेसच्या पाठीमागे असलेल्या एका बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीवर दोन कावळे बसले होते. चाणाक्ष चाहत्याच्या नजरेतून हे सुटले नाही आणि त्याने राजेश्वरी हिला कमेंट करताना ‘ मॅडम तुमच्यावर दोन कावळे लाईन मारत आहेत ‘, अशी कमेंट केली.

राजेश्वरी हीने अर्थातच ही कमेंट वाचली आणि तिने देखील चाहत्याला जे प्रत्युत्तर दिले आहे त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. राजेश्वरी खरात हिने या चाहत्याला ‘ रंगा बिल्ला ते माझे पाळीव कबूतर आहेत रंगा आणि बिल्ला ‘ असे म्हटलेले आहे. चाहत्याचा देखील फेसबुक आयडी रंगा बिल्ला असून हे फेक अकाउंट असण्याची शक्यता आहे राजेश्वरी खरात हिच्या हजरजबाबीपणाचे देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.