थेरगाव क्वीन डायरेक्ट जेसीबी घेऊन, म्हणतेय XXX बघितलं का हत्यार ?

आपल्या इंस्टाग्राम रील्सवर सरसकट शिव्या आणि धमक्या देणाऱ्या थेरगाव क्वीन हिला पोलिसांनी काही महिनांपुर्वी ताब्यात घेऊन ती आणि तिच्यासोबत असलेला तरुण यांच्यावर कारवाई केली होती मात्र त्यानंतर देखील थेरगाव क्वीन हिची थेरं कमी होताना दिसत नाहीत. तिचे असेच धमकीवजा व्हिडीओ पुन्हा चर्चेत येत असून त्यात देखील अशीच भाषा वापरली जात आहे .

थेरगाव क्वीनचे वेगवेगळे व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत असून त्यामध्ये धमकी वजा इशारे ती देत आहे. तिच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून अशाच स्वरूपाचे इतरही अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम वर पॉप्युलर होण्याच्या उद्देशाने बनवले जातात . थेरगाव क्वीन हिचे व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर अनेक समंजस नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानंतर पोलिसांकडून तिला ठाण्यात चौकशीसाठी देखील बोलावण्यात आलेले होते मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही असे एकंदरीत दिसून येत आहे .