माझे वय साठ नव्हे तर.. , काय म्हणाले आशिष विद्यार्थी ?

Spread the love

बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी अनेक चित्रपटात खलनायकी भूमिका साकारून आपल्या अभिनयाचे चीज केलेले आहे. हिंदी मराठी तेलगू तामिळ कन्नड इंग्लिश अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलेले असून वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी फॅशन इंटरप्रीटर असणाऱ्या एका महिलेसोबत लग्न केलेले असल्याचे फोटो व्हायरल झालेले होते . त्यांच्या या विवाहाची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून आपले वय ६० नसल्याचे सांगितले आहे .

उपलब्ध माहितीनुसार , आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात आसाम येथील फॅशन इंटरप्रीटर असणाऱ्या रूपाली बरुआ यांच्यासोबत केलेली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून कोलकत्ता येथील एका क्लबमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला होता. असामी पद्धतीने त्यांनी विवाह केलेला आहे.

आशिष विद्यार्थी यांचे हे दुसरे लग्न असून याआधी त्यांनी राजेशी यांच्यासोबत लग्न केलेले होते त्यातून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. आशिष विद्यार्थी हे मूळचे केरळ येथील असून त्यांच्या आई कथक नर्तिका होत्या. बालपणापासूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळालेले होते बॉलीवूडमधील सरदार या चित्रपटातून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेले नाही. व्हायरल व्हिडिओत त्यांनी आपले वय हे ६० नसून ५७ वर्षे असल्याचे सांगितले आहे .


Spread the love