नवाब मलिक यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट अन मुंबई पोलीस सक्रिय , वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

Spread the love

आर्यन खान अटक प्रकरणी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली असून येत्या २४ तासात राज्य सरकार SIT स्थापन करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एनसीबी आणि समीर वानखेडेंना यांना चौकशीला सामोरं जाव लागणार आहे त्यामुळे आर्यन खान प्रकरण आणखीनच रंगण्याची शक्यता आहे . आर्यन खान यास व इतर बॉलिवूड मंडळीस यात गोवले आले आहे का ? हे देखील समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे यांच्या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.

नवाब मलिक यांच्या भेटीनंतर मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग आला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांविरोधात देखील अनेक तक्रारी दाखल झाल्या असून मुंबई पोलिसांकडे ५ वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत म्ह्णून राज्य सरकारने या प्रकरणी SIT स्थापन करण्याची तयारी केली आहे. वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केली जाईल आणि या तक्रारींचा तपास करण्यात येण्याची शक्यता आहे .

नवाब मलिक काय म्हणाले ?

मी परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असता क्रुझ ड्रग्स प्रकरणा एका पंचाने प्रतिज्ञापत्र सादर करून धक्कादायक खुलासा केला होता. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी एसआयटीच्या मार्फत चौकशी करावी . प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल केला जाणार असून एफआयआर दाखल झाल्यानंतर अनेक बाबी उघड होतील .

‘एफआयआर हा खंडणी प्रकरणात दाखल होईल. पंचानी जो काही खुलासा केला आहे, कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी ही गंभीर घटना असून अनेक तक्रारी समोर आल्याचं सांगितलं आहे. बॉलिवूडही मोठी इंडस्ट्री आहे. त्यावर लाखो लोकांची घर चालत आहे. त्याचा जीडीपीमध्ये वाटा आहे. फक्त अभिनेत्यांवर संशय घेऊन कारवाई करण्यात आली त्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाठवणार आहे. समीर वानखेडे यांनी खोटे जातप्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवली असा आमचा आरोप आहे. अनेक दलित संघटनांनी आमच्याकडून पुरावे मागितले आहे. हे पुरावे घेऊन जात पडताळणी संस्थेकडे जाणार आहे. त्यांचे जातप्रमाणापत्र हे बनावट असून ते तपासातून समोर येईल.


Spread the love