समीर वानखेडेंच्या वडिलांचा ‘ अजबच ‘ दावा ? ट्विटरवर ‘ समीर दाऊद वानखडे ‘ चक्क ट्रेंडिंगमध्ये

Spread the love

समीर वानखेडे यांनी आपली धार्मिक ओळख लपवल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला बुधवारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांच्या या अजब अशा दाव्याची सोशल मीडियात मोठी चर्चा आहे त्यानंतर ट्विटरवर ‘समीर दाऊद वानखडे ‘ असे नाव चक्क ट्रेंडिंग मध्ये आले आहे .

‘ एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना अशी हाक मारली जाते. तसंच माझ्या पत्नीचे नातेवाईक किंवा अन्य कोणीतरी मला प्रेमाने दाऊद हाक मारत असावेत. मी ही शक्यता नाकारत नाही ‘ असा अजबच युक्तिवाद ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे . पुढे ते म्हणाले की , ‘ मी मागासवर्गीय आहे. मग माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होऊ शकतो? फेसबुकवर दाऊद वानखेडे या नावाने प्रोफाईल असल्याचे मला माहिती नाही. पण एखादवेळी माझ्या पत्नीकडील नातेवाईक मला दाऊद म्हणाले असतील. आपण लवकरच समीर वानखेडे यांच्या खरा जन्मदाखला सादर करु, असा दावाही ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे .

नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करताना, ‘ त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले. नवाब मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम असून वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.


Spread the love