वरिष्ठांच्या ‘ ह्या ‘ भूमिकेनंतर एनसीबीत मोठी घडामोड

Spread the love

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप झाल्यावर एनसीबीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण होत आहे. एनसीबीवर अन्य बोगस कारवायांचाही आरोप करण्यात येत असल्याने आता एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई थंडावल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्याभरात एकही कारवाई किंवा धाड मारण्यात आलेली नाही. इतकंच नाही तर आर्यन खान प्रकरणातही कारवाई करण्यात आलेली नाही. एनसीबीला कारवाई करण्यास दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. काही दिवस कारवाई नको, असं आदेश दिलेले असल्याने एनसीबीची इतर ठिकाणी देखील कारवाई थंडावलेली पाहायला मिळते आहे .

एनसीबीचे अधिकारी स्वत:च ड्रग्स प्लांट करतात, पैसे उकळतात अशाच स्वरुपाच्या बहुतांश तक्रारी करण्यात आल्या आहेत. पंचाकडून कोऱ्या पेपरवर सह्यांचे देखील आरोप झालेले आहेत .मागील आठवड्यात अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी झाली आहे. त्यानंतर तिला पुन्हा सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं मात्र वाद निर्माण होताच ते समन्स रद्द करण्यात आले आहे अन नवीन एकही गुन्हाही दाखल झालेला नाही तर जुन्या गुन्ह्यातील आरोपीही शोधले जात नाहीत. त्यामुळे एकूणच सर्व आरोपानंतर एनसीबीची कारवाई ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे.


Spread the love