.. अन कोर्टात साक्ष द्यायला तोंडात तंबाखू धरून आला , न्यायाधीश म्हणाले..

Spread the love

न्यायालयात जाऊन साक्ष द्यायची म्हटलं की बरेच लोक हादरून जातात मात्र काही जण इतके रुळलेले असतात कि त्यांना त्याचे काही वाटत नाही तर अनेक लोक न्यायालय या प्रक्रियेशीच अनभिज्ञ असल्याने देखील चुका करतात, अशीच एक घटना दिल्ली इथे उघडकीस आली असून एका प्रसिद्ध खून खटल्यात साक्षीदार म्हणून बोलावण्यात आलेला व्यक्ती चक्क तंबाखू खाऊन पिंजऱ्यात उभा राहिला. तोंडात तंबाखू असल्याने त्याला न्यायालयात नीट बोलताही येत नव्हतं हे पाहून न्यायाधीश त्याच्यावर चांगलेच भडकले. दिल्ली इथे हा प्रकार घडलेला आहे.

वकील शाहीद आझमी यांच्या खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान एका साक्षीदाराला न्यायालयात बोलावण्यात आलं होतं मात्र संबंधित साक्षीदाराच्या तोंडात तंबाखू असल्याने त्याला न्यायालयात व्यवस्थित बोलता येत नव्हतं. तो नेमकं काय बोलत आहे, हे कोणालाही कळत नव्हतं त्यामुळे न्यायाधीशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला १०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयीन प्रक्रियेशी साक्षीदाराला काहीही देणं घेणं नसल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवून त्याला 100 रुपयांचा दंड ठोठावला.

सरकारी वकिलांनी साक्षीदाराची बाजू मांडत न्यायालयाला सांगितलं की, साक्षीदार हा गरीब घरातला असून त्याला न्यायालयाच्या नियमांबद्दल फारशी माहिती नाहीये मात्र न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तिवाद अमान्य करत साक्षीदाराला 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे.


Spread the love