डॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या भेटीसाठी लॉजवर यायची अन म्हणायची की ..

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना मध्य प्रदेशात समोर आलेली असून चक्क एका डॉक्टर असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने आपल्यावर कुरिअर बॉयने बलात्कार केल्याचे म्हटलेले आहे. विशेष म्हणजे कुरिअर बॉय आणि या महिलेची अशीच एकदा डिलिव्हरी देताना मैत्री झाली होती त्यानंतर लॉजवर हा प्रकार घडलेला आहे. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन वर्षांपर्यंत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये ठेवलं मात्र त्यानंतर लग्नास नकार दिला आणि तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.जबलपुर आणि भोपाळ इथे हा प्रकार घडलेला आहे.

एसआय आकांक्षा शर्मा यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, ‘ भोपाळ इथे राहणारी 36 वर्षी महिला खासगी काम करत असून तिच्या डॉक्टर पतीचा 2016 मध्ये मृत्यू झाला आहे तर तिला 13 वर्षांची मुलगीही आहे. पीडित महिला ब्लू डॉट कंपनीकडून ती कुरिअर मागवीत होती याच दरम्यान जबलपूरमध्ये कुरिअर कंपनीत नोकरी करणारा दीपक सिंह ठाकूरसोबत अशीच एकदा कुरिअर पार्सलच्या निमित्ताने मैत्री झाली. मैत्री वाढल्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले. त्यानंतर दीपक तिला भेटायला जबलपूरहून भोपाळला येऊ लागला.

1 जानेवारी 2017 मध्ये दीपकने तिला भेटायला न्यू मार्केट येथील कंचन लॉज येथे बोलावलं आणि लग्नाचे वचन देऊन लॉजमध्ये तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि त्यानंतर दीपक जबलपूरमधून भोपाळला महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. दोन वर्षांपर्यंत सोबत राहिल्यानंतर जेव्हा महिलेने दीपकवर लग्नाचा दबाव केला तर त्याने नकार दिला त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून त्याचा शोध सुरु आहे.


Spread the love