विनयभंगाच्या आरोपातील व्यक्ती पुण्यातून धरला मात्र तब्बल ‘ इतक्या ‘ वर्षांनी

Spread the love

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबई येथे उघडकीस आली असून सदर घटनेची परिसरात जोरदार चर्चा चालू आहे. सुरू आहे. घटना काहीशी वेगळीच असून चक्क तेवीस वर्षांपूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला अंधेरी पोलिसांनी पुणे येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद अहमद मुलानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, सदर आरोपीने तेवीस वर्षांपूर्वी एका महिलेचा विनयभंग केला होता आणि त्यानंतर तो फरार झालेला होता. आरोपीची पत्नी रेहाना हीचा संपर्क मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत पुण्यातील येरवडा परिसरातील जय जवान नगर येथे जाऊन त्याला अटक केली. सन 1999 ला अंधेरी रेल्वे स्थानकावर त्याने एका महिलेचा विनयभंग केला होता त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तो फरार झाला. न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Spread the love