धक्कादायक.. हिंदीचा पेपर झाल्यावर गाडीवर बसवले अन ..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली असून अल्पवयीन 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून समाज माध्यमात व्हायरल करण्यात आले याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत 21 मार्च 2022 रोजी हिंदीचा पेपर झाल्यावर दुसऱ्या दिवशी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी या दोघांनी पीडित मुलीला जबरदस्तीने गाडीवर बसून एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी कृष्णा चौधरी याने पीडित मुलीला पाणी पिण्यास दिले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला यावेळी त्याचे फोटो काढून त्याने ते सोशल मीडियात व्हायरल केले.

सदर प्रकरणी कृष्णा चौधरी आणि त्याचा मित्र बंटी यांच्याविरुद्ध अत्याचार यासह पॉक्सोकायदा अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक अशोक भुतेकर पुढील तपास करत आहेत.


Spread the love