देशात एक वेगळी घटना समोर आलेली असून सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. बिहारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आनंद किशोर योग्य त्या वेशभूषेत न्यायालयात न आल्याने पाटणा हायकोर्टाचे न्यायाधीश यांनी त्यांना चांगलेच झापले आहे. संपूर्ण प्रकरणात आनंद किशोर हे कोर्टात हजर झाले होते मात्र त्यांनी पूर्ण बाह्यांचे शर्ट परिधान केलेले नव्हते त्यामुळे न्यायाधीशांनी त्यांना चांगलेच झापले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, संबंधित न्यायमूर्ती हे कर्नाटक उच्च न्यायालयात या आधी कार्यरत होते त्यानंतर ते पाटणा उच्च न्यायालयात कर्तव्यावर रुजू झालेले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी आनंद किशोर हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात.
आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना कोर्टासमोर हजर होण्यासाठी ड्रेस कोड हा ठरलेला आहे मात्र आनंद किशोर यांनी पूर्णपणे पांढरा शर्ट परिधान केलेला होता आणि शर्टाचे वरचे बटन देखील खुले होते यावरून देखील न्यायालयाने , ‘ तुम्ही थिएटरमध्ये आले आहात का ? न्यायालयात कोणत्या ड्रेस कोडमध्ये यायचे हे तुम्हाला माहित नाही का ? किमान कोट घालावा कॉलर तर खुली असू नये हे देखील माहिती नाही का ? अशी चांगलीच कानउघडणी केली आहे .