चमत्कारच..पुरुष व्यक्तीच्या शरीरात चक्क गर्भाशय अन ..

Spread the love

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना चीनच्या बीजिंग येथे उघडकीला आलेली असून वीस वर्षापासून लघवीची समस्या असलेल्या एका पुरुष व्यक्तीच्या शरीरात चक्क अंडाशय आणि गर्भाशय आढळून आलेले आहे. सदर घटनेची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे असून हा एक वैद्यकीय चमत्कार मानला जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चेन लि असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय 33 वर्षे आहे. तरुण असल्यापासून त्याला लघवीचा त्रास होत होता त्यानंतर त्याने गेल्यावर्षी वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या शरीरात चक्क स्त्री लिंगात आढळणारी गुणसूत्रे आढळून आली. एक महिन्यापासून त्याच्या लघवीवाटे रक्त येत होते आणि पोटात देखील अस्वस्थ वाटायचे त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला.

त्याच्या या त्रासाचे निदान करण्यासाठी तो उपचारासाठी गेला तेव्हा वैद्यकीय तपासणी त्याच्या शरीरात चक्क गर्भाशय आणि अंडाशय असल्याचे समोर आले. आपल्या शरीरातील स्त्री प्रजनन अवयव काढण्यासाठी त्याने पुढाकार घेत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला आणि सहा जून रोजी त्याच्यावर तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातील हे अवयव काढून टाकण्यात आले आणि त्याला सुट्टी देण्यात आली.


Spread the love