निव्वळ कुतूहल म्हणून जिलेटीनची कांडी घरी आणून दिला करंट अन ..

Spread the love

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात निंभेरे येथे कालव्याच्या बोगद्याजवळ शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षीय मुलाला एक जिलेटीनची कांडी आढळून आली होती. उत्सुकतेपोटी ज्याने ही कांडी घरी आणून तिला करंट दिला असता घरातच मोठा स्फोट होऊन त्यात यश अंबरनाथ नागरे ( राहणार निंभेरे ) हा मुलगा गंभीर जखमी झालेला आहे. संगमनेर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

निंभेरे येथे उजव्या कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण झालेले असून इयत्ता सहावीत शिकत असलेला यश हा शेळ्या चारण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेला होता त्यावेळी त्याला बोगद्याजवळ असलेल्या दगडावर एक जिलेटीनची कांडी आढळली आणि ती तो घरी घेऊन आला. काहीतरी वेगळा प्रकार करायचा म्हणून त्याने तिला करंट दिला आणि त्यानंतर जोरदार स्फोट होऊन त्याच्या दोन्ही हातांना तसेच चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा झालेल्या आहे. संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून तीन लाख रुपयांचा खर्च यासाठी येणार असल्याची माहिती आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब असल्याने नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे .


Spread the love