‘ फार्मवर येताय ना मग कपडे नकोत ‘, नवीन संकल्पनेला जोरदार प्रतिसाद

जगात काही ठिकाणांची अचानकपणे जोरदार चर्चा होऊ लागते असेच एक प्रकरण सध्या ब्रिटन इथे समोर आलेले आहे. ब्रिटनमधील एक्सेस इथे एक अनोखा टुरिस्ट पॉईंट सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे . इथे एक न्यूड पार्क असून येथे येणाऱ्या पर्यटकांना संपूर्णपणे विवस्त्र अवस्थेत वावरावे लागते त्यामुळे या पार्कची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

बेवर्स फार्म असे या फार्मचे नाव असून त्याची तपशीलवार माहिती ब्रिटिश नेचर वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे.काही दिवस वास्तव्य करण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना या ठिकाणी अंगावर कोणतेही कपडे घालणार नाही ही अट मान्य करावी लागते त्यानंतरच त्यांना या फार्ममध्ये प्रवेश दिला जातो. आगळ्या वेगळ्या असलेल्या या फार्ममध्ये पाच कॉटेज आणि दोन इमारती आहेत त्यामध्ये पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते.

सदर फार्मला सरकारकडून फाइव स्टार रेटिंग मिळाले असून विशेष म्हणजे या फार्ममध्ये पर्यटकांसाठी सेवेत जे कर्मचारी असतात तसेच जेवण बनवणारे कर्मचारी यांनादेखील विवस्त्र अवस्थेत असण्याचे बंधन करण्यात आलेले आहे. पर्यटनस्थळ म्हणून अठराव्या शतकामध्ये हे विकसित करण्यात आलेले होते. सुरुवातीच्या काळात या कल्पनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बुकिंग इथे होत असल्याने हा फार्म चालवणारे जॉन आणि मार्गारेट लेविस यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.