सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ही घटना घडलेली आहे. राज्यात सध्या डेंग्यूचा कहर सुरू असून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झालेला आहे अशातच गुरुवारी शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये वर्गात शिकवत असताना शिक्षक खाली पडले आणि त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.
उपलब्ध माहितीनुसार, शहरातील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकवत असलेले 32 वर्षीय आल्फ्रेड सुमित कुमार कुजुरू असे मयत शिक्षकाचे नाव असून ते विद्यार्थ्यांना कॉमर्स हा विषय शिकवत होते. गुरुवारी दुपारी अकरावीच्या विद्यार्थ्यांना ते शिकवत असताना अचानकपणे त्यांना भोवळ आली आणि ते वर्गातच खाली कोसळले. झाला प्रकार पाहून विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांच्याकडे धाव घेतली मात्र त्यांचा जागीच मृत्यू झालेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
प्राचार्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुमित कुमार हे गेल्या तीन महिन्यापूर्वीच कॉलेजमध्ये रुजू झालेले होते. त्यांची आई ह्या देखील कॉलेजमध्ये शिकवत असायच्या मात्र काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या होत्या. सुमित कुमार यांना काही गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता मात्र विद्यार्थी अभ्यासात मागे पडतील म्हणून ते सुट्टी न घेता शाळेत येत होते. काही दिवस त्यांनी सुट्टी घेतली होती मात्र अधिक सुट्टी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून त्यांनी शाळेत शिकवण्यासाठी आले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी शिक्षिका असल्याची माहिती आहे.