कोणाचे नशीब कधी कसे बदलेल कोणी सांगू शकत नाही अशीच एक घटना चीनमध्ये समोर आली असून एकेकाळी कोट्यावधी रुपयांचे मालक असलेल्या व्यक्तीवर रस्त्याच्या कडेला स्टॉल टाकून आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्याची वेळ आलेली आहे. आपले कर्ज फेडण्यासाठी त्यांनी सर्व हॉटेल्स संपत्ती घरे सर्व काही विकून टाकले मात्र तरीही कर्ज फिटत नसल्याने अखेर त्यांनी रस्त्याच्या कडेला एक स्टॉल सुरू करून तिथे स्वतः काम करण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे ते देश सोडून कुठेही पळून गेलेले नाहीत.
उपलब्ध माहितीनुसार, तांग जियान असे या उद्योजकाचे नाव असून काही वर्षांपूर्वी ते यशस्वी उद्योजक होते. त्यांची हॉटेलची चैन होती आणि वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती होती मात्र त्यांनी एका मोठ्या उद्योगात पैसे गुंतवले आणि तिथे नशिबाचे फासे उलटे पडले. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी एकेक करत सर्व संपत्ती त्यांनी विकून टाकली.
आपली सर्व संपत्ती विकली तरीदेखील कर्ज फिटत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबाची उपजीविका कशी करायची हा देखील त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी अखेर रस्त्याच्या कडेला एक स्टॉल सुरू केले असून तिथे ते स्वतः काम करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक केले जात असून अनेक जणांनी त्यांना त्यांच्या डोक्यावरील कर्ज लवकरात लवकर फिटावे यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत .