मुलीला नवरी म्हणून पाहण्यासाठी अडकला प्राण , अक्षता पडल्या अन..

Spread the love

नवरी

सोशल मीडियावर सध्या एका आईची जोरदार चर्चा सुरू असून गंभीर आजारी असलेल्या आईने आपल्या मुलीचे लग्न तिच्यासमोर पाहिले आणि त्यानंतर अवघ्या दोन तासात तिने आपले प्राण सोडले . बिहारच्या गया येथील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयुबाहेर हे लग्न पार पडले.

उपलब्ध माहितीनुसार, बाली गावातील रहिवासी असलेले लालन कुमार यांची पत्नी पूनम कुमारी यांच्यावर गया येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कुटुंबीयांनी त्यांची प्रकृती चिंताजनक सांगितलेली होती आणि कुटुंबाला कुठल्याही क्षणी त्यांचा मृत्यू होऊ शकतो याची देखील कल्पना दिलेली होती मात्र पूनम यांना त्यांच्या मुलीचा विवाह पाहण्याची इच्छा होती म्हणून रुग्णालयाच्या बाहेर मांडव टाकण्यात आला आणि बेडवरून पुनम यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा पाहिला

चांदणी असे या मुलीचे नाव असून तिची आई हृदयविकाराने त्रस्त होती. त्यांची शेवटची इच्छा आपल्या लेकीचे लग्न पाहण्याची होती म्हणून आपण हॉस्पिटलमध्येच लग्न केल्याचे तिने सांगितले असून लग्नानंतर अवघ्या दोन तासात या आईचे निधन झालेले आहे. तिच्या लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.


Spread the love