आपल्या मित्राला चांगली नोकरी लागली किंवा त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगले झाले तर त्याच्याकडून पार्टी घेणारे महाभाग काही कमी नाहीत मात्र पुण्यातून एक वेगळीच घटना समोर आलेली असून आपला मित्र सरपंच झाला म्हणून चक्क त्यांच्या मित्रांनी त्यांना फॉर्च्युनर गाडी भेट दिलेली आहे. पुणे नगर रोडवरील केसनंद गावातील ही घटना असून या मित्रांच्या मैत्रीची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
पुणे जिल्ह्यात असलेल्या केसनंद गावातून दत्तात्रय हरगुडे पहिल्यांदाच निवडणूक लढवून सरपंच झाले आणि त्यांना सरपंचपद मिळताच मित्रांनी एकत्र येत थेट फॉर्च्युनर कार भेट दिली आहे.या घटनेची चर्चा परिसरात जोरात सुरु असून यावेळी त्यांच्या मित्रांनी ‘ आबांनी गावाला कायमच भरभरून दिलेले आहे आणि स्वतः ते सध्या गाडीत फिरतात म्हणून आम्ही सर्वानी त्यांना ही गाडी भेट दिलेली आहे ‘ असे म्हटलेले आहे . आजच्या बाजारभावानुसार या गाडीची किंमत तब्बल ३५ ते ४० लाख रुपये असून पुण्यात या मैत्रीची जोरदार चर्चा आहे .