सामान्य व्यक्तींसाठी आपल्या कुटुंबाला कार खरेदी करणे हा एक महत्त्वाचा क्षण असतो. कार नवी असो वा जूनी वेळीअवेळी आपल्या उपयोगाला यावी यासाठी कार घेण्याआधी तिचा भरपूर अभ्यास करून त्यानंतर सर्वजण कार खरेदी करतात मात्र कार खरेदी केल्यानंतर जर काही अडचण आली तर कार कंपन्या मनमानी पद्धतीने आकारणी करतात आणि त्यांचे ऐकले नाही तर सर्विस देखील देत नाही असाच एक प्रकार समोर आलेला असून मोठ्या उत्साहात महिंद्रा एक्स यु व्ही 300 ही कार खरेदी केल्यानंतर एका ग्राहकाला चांगलाच मनस्ताप झालेला आहे त्यानंतर मात्र या ग्राहकांनी कारची जी काही अवस्था केली त्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
पंजाब येथील हे वृत्त असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीने ही कार खरेदी केली होती मात्र त्यानंतर ही कार सतत बंद पडू लागली आणि कंपनीकडून योग्यरीत्या त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्रस्त झालेल्या या व्यक्तीने चक्क कारवर ‘ युज मी ‘ असे सांगत असे लिहून तिचा वापर चक्क कचरा गोळा करण्यासाठी सुरू केला.. कारमध्ये समस्या सुरू झाल्यानंतर अनेकदा या व्यक्तीने कंपनीकडे आपल्या तक्रारीची दखल घ्यावी म्हणून विनंती केली होती मात्र कंपनीने त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
महिंद्रा एक्स यु व्ही 300 या कारवर या व्यक्तीने चक्क कचराकुंडीवर लिहितात तसे युज मी असे लिहिले आणि ही कार कचरा गोळा करण्यासाठी परिसरात फिरवली. कारच्या मालकानुसार ही कार आता कोणत्याच कामाची राहिलेली नाही त्यामुळे तिचा काय वापर करावा यासाठी मी विचार केला आणि त्यानंतर किमान कचरा उचलण्यासाठी तरी हिचा वापर होईल असे सांगत 15 लाख रुपये किमतीची ही कचराकुंडी मी घेतलेली असून अडाणी आणि अंबानी यासारख्या उद्योगपतींकडे देखील 15 लाख रुपये किमतीची कचराकुंडी नाही असे म्हटलेले आहे.
कारचे मालक यांनी पुढे म्हटले आहे की, ‘ आत्तापर्यंत दहा वेळा मी या कारला सर्विस सेंटरला घेऊन गेलो मात्र कारमधील समस्या काही दूर झाल्या नाहीत . अनेकदा तक्रार करून देखील मला पश्चाताप झालेला आहे कार खरेदी करण्यासाठी पैसे खर्च केले मात्र त्यातून समाधान तर मिळाले नाहीच उलट मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे अखेर या कारचे कचराकुंडीत रुपांतर करून किमान आपल्या या कारमुळे शहराची तरी स्वच्छता आपल्याला ठेवता येईल ‘ असे म्हटले आहे.