सोशल मीडियावर सध्या दोन जुळ्या भावांच्या मृत्यूची जोरदार चर्चा सुरू असून विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने ते जन्माला आले आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने त्यांना मृत्यूने गाठले त्यामध्ये एक जण घराच्या छतावरून पडून मृत्यू मयत झाला तर दुसरा पाण्याच्या टाकीत पडला त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला.
उपलब्ध माहितीनुसार, सोहन सिंह आणि सुमेर सिंह ( वय सव्वीस वर्षे ) भावांची नावे असून राजस्थान येथील बारनेर जिल्ह्यातील हे रहिवासी आहेत. बारनेरपासून नऊशे किलोमीटर अंतरावर जयपूर आणि सुरत येथे ते वास्तव्याला होते त्यात सोहन हा जयपूर येथे शिक्षणासाठी होतात तर सुमेर हा सुरत येथे काम करत होता.
बुधवारी रात्री मोबाईलवर बोलत असताना अचानकपणे सुमेर हा छतावरून खाली पडला तर त्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या आत गुरुवारी पहाटे सोहन हा पाण्याच्या टाकीत पडून मृत्युमुखी पडला. घराच्या जवळच्या पाण्याच्या टाकीजवळून पाणी आणण्यासाठी तो टाकीकडे गेलेला होता मात्र याच दरम्यान त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. आपला जुळा भाऊ सोहन याच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण नको म्हणून सुमेर हा सुरत इथे काम करत होता. एकमेकांपासून 900 किमी दूर असूनही अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने त्यांना मृत्यूने गाठले यावरून नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.