सोशल मीडियावर अनेक लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास बंदी आहे मात्र फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटा हिने फ्री निप्पल मोहिमेवर बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला असल्याने येत्या काळात फेसबुकवर बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करता येतील. दहा वर्षांपूर्वी फेसबुकने या प्रकारावर बंदी घातलेली होती मात्र त्यानंतर त्यांनी पॉलिसीत बदल केलेला आहे.
अमेरिकेतील काही महिलांनी फ्री निप्पल नावाची जागतिक मोहीम राबवली होती त्यामध्ये महिलांना देखील पुरुषाप्रमाणे टॉपलेस फिरण्याचा अधिकार मिळावा अशी देखील मागणी त्यांची होती त्यानंतर काही ठिकाणी अमेरिकेत या प्रकाराला परवानगी देखील देण्यात आली मात्र फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या ठिकाणी अशा पद्धतीचे पोस्ट टाकण्यावर बंदी होती. फोटो पोस्ट करणाऱ्या मागचा हेतू आणि त्याचा पाहणाऱ्यांना होणारा फायदा याची सांगड बसवणे अत्यंत अवघड असून त्यामुळेच फेसबुकने हा निर्णय त्यावेळी घेतला होता मात्र आता हा निर्णय उठवण्यात आल्याने पुढे नक्की काय होईल आणि कुठल्या पोस्ट स्वीकारल्या जातील किंवा त्यासाठी कुठले फिल्टर्स लावले जातील हे देखील येत्या काळात दिसून येणार आहे.