सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे हा विवाह सुरू होता मात्र नवरदेवाला नोटा मोजता येईना ते पाहून नवरीने चक्क विवाह रद्द केलेला आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यात ही घटना घडलेली असून नवरदेवाला मानसिक आजार होता ही बाब आमच्या पासून लपवण्यात आलेली होती असे देखील नववधुने यावेळी सांगितले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दुर्गापूर गावात हा विवाह सोहळा सुरू असताना पुरोहिताला नवरदेवाच्या वर्तनाबद्दल शंका आली म्हणून त्याने याप्रकरणी वधू पक्षाला कल्पना दिली आणि वधूपक्षाने त्याची परीक्षा घेण्याची ठरवली त्यावेळी त्याला काही नोटा मोजण्यासाठी म्हणून दिल्या. त्यातील दहा रुपये देखील त्याला मोजता आले नाहीत त्यानंतर त्याची होणारी पत्नी रीता सिंग ही लग्न मांडवातून तरातरा निघून गेली .
लग्न मोडल्यानंतर वरपक्षाने आमच्याशी दगाबाजी केल्याचा आरोप केला तर वधू पक्षाने तुम्ही देखील आमची फसवणूक केलेली आहे असे देखील म्हटले आणि अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही पक्षांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला मात्र नववधू ही विवाह मोडण्याच्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे अखेर वर पक्षाला आपल्या घरी परतावे लागले.