मुंबई पोलीस..मी अंतराळात अडकलोय , पोलिसांचा भन्नाट रिप्लाय

Spread the love

सोशल मीडियावर सध्या मुंबई पोलिसांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा सुरू असून मुंबई पोलीस हे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्कात आहेत . नागरिक देखील त्यांना अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत भंडावून सोडतात मात्र मुंबई पोलिसांची उत्तरे देखील तितकीच समर्पक असल्याचे गेल्या काही दिवसात दिसून येत आहे.

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडल वरून हेल्पलाइन क्रमांक जारी केलेला होता त्या ट्विटवर एका युजरने मजेशीर पोस्ट करत मुंबई पोलिसांची मदत मागितली. मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये,’ जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही एखाद्या गंभीर परिस्थितीत अडकला तर वाट पाहू नका फक्त एक शून्य शून्य क्रमांकावर फोन करा, ‘ असे म्हटलेले होते.

मुंबई पोलिसांच्या एका ट्विटवर एका व्यक्तीनेआपण चंद्रावर स्पेस सूट घालून पृथ्वीकडे पहात उभे आहोत असा फोटो टाकला आणि फोटो पोस्ट करताना ‘ आपण सध्या अंतराळात अडकलेलो आहोत तुमच्या मदतीची अपेक्षा आहे ‘, असे म्हटलेले होते त्यानंतर मुंबई पोलिसांनी या ट्विटला जबरदस्त रिप्लाय दिलेला आहे. पोलिसांच्या या रिप्लायची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी त्याला रिप्लाय करताना, ‘ हे आमच्या अधिकारक्षेत्रांतर्गत येत नाही मात्र आम्हाला हे पाहून बरं वाटलं की अगदी चंद्रावर अडकल्यानंतर देखील तुमचा आमच्यावर विश्वास आहे. अगदी मून अँड बॅक म्हणतात तसा ,’ असा रिप्लाय दिलेला आहे. मुंबई पोलिसांनी शब्दांचा वापर अत्यंत समर्पकरीत्या केलेला असून पोलिसांच्या या हजरजबाबीपणाचे देखील सोशल मीडियात कौतुक केले जात आहे .


Spread the love