लहान मुलांचा आवडता खेळ म्हणजे लपाछपी मात्र लपाछपीमध्ये अनेकदा कुठे लपावे याचे मुलांना ज्ञान नसल्याने ते कुठेही जाऊन लपतात आणि त्यातून अनंत अडचणी निर्माण होतात. अशीच एक घटना बांगलादेश इथे समोर आलेली असून बांगलादेशच्या चटगाव बंदराजवळ 11 जानेवारी रोजी काही लहान मुले लपाछपी खेळत होती त्यावेळी पंधरा वर्षाचा फहीम नावाचा मुलगा एका कंटेनरमध्ये जाऊन लपला आणि बराच काळ तो कुणाला सापडला नाही त्यानंतर त्याला तिथे झोप लागली आणि हा कंटेनर एका व्यावसायिक जहाजावर लोड करण्यात आला आणि बांगलादेश इथून निघून गेला.
मुलाला ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी तो समुद्रात एका कंटेनरमध्ये होता. 17 जानेवारी रोजी तो मलेशिया येथे पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. त्याला कंटेनर मधून बाहेर काढण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत तो तिथे आढळून आलेला होता. मलेशियाचे गृहमंत्री यांनी माध्यमांना या प्रकरणी माहिती दिलेली असून सुरुवातीला हे प्रकरण मानवी तस्करीचे असल्याचा दावा करण्यात आलेला होता मात्र तपासामध्ये हा प्रकार लपाछपीमुळे झाल्याचे समोर आलेले असून त्याला कंटेनरमधून बाहेर काढले त्यावेळी सहा दिवस उपाशीच असल्याचे आढळून आले. त्याला पुन्हा बांगलादेशात पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून केवळ अज्ञानातून हा प्रकार घडल्याने या प्रकरणी कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.