सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नियम राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी सोनम गुप्ता बेवफा है असे लिहिलेली एक नोट जोरदार व्हायरल झालेली होती ही सोनम गुप्ता कोण होती आणि हे कोणी लिहिले होते हे अद्यापपर्यंत देखील समोर आलेले नसून असाच एक दुसरा प्रकार सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आलेला आहे. एका दहा रुपयाच्या नोटेवर एक मेसेज व्हायरल झालेला असून कुसुम नावाच्या एका तरुणीने हा मेसेज व्हायरल केलेला आहे.
आपल्या प्रियकराला कुसुम हिने भावनिक साद घातलेली असून त्यामध्ये ‘ विशाल माझं लग्न 26 एप्रिलला आहे. मला इथून पळून घेऊन जा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते तुझीच कुसुम ‘ असे तिने म्हटलेले आहे. कुसुम ही खरोखरच मुलगी आहे की सहज गंमत म्हणून कोणी हा प्रकार केलेला आहे याची देखील सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा असून काही जणांनी या मेसेजला या प्रकरणी प्रतिक्रिया देतानाआता सीआयडी टीमनेच यात लक्ष घालावे असे देखील म्हटलेले आहे.