देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून लग्न झाल्यानंतर पत्नीसोबत मधुचंद्राची स्वप्ने पाहणाऱ्या एका पतीला जोरदार झटका बसलेला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ही घटना समोर आलेली असून लग्नानंतर वधूला तिच्या माहेराहून घरी जात असतानाच या वधूने प्रियकरासोबत धूम ठोकलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नवरदेवाचे वऱ्हाड हे प्रतापगड भागातून प्रयागराज जिल्ह्यातील मोईमा गावात आलेले होते. सोमवारी लग्न आटोपल्यानंतर नववधू हिने सासरे जाताना ढसाढसा अश्रू ढाळले आणि त्यानंतर एका चारचाकी गाडीत पतीसोबत ती सासरी जाण्यासाठी निघाली होती. रस्त्यात जाताना लघुशंका करण्यासाठी म्हणून ती उतरली त्यावेळी तिचा कुणाला संशय आला नाही. रस्त्यापासून काही अंतरावरती पायी चालत गेली आणि नवरा गाडीत बसून तिची वाट पाहत होता मात्र ती बराच वेळ झाला तरी परत आली नाही.
तिला काही इजा झाली असेल म्हणून शंका आल्याने पती खाली उतरला मात्र ती आढळून आली नाही. त्यानंतर परिसरात चौकशी केली तेव्हा एक तरुण बराच वेळापासून गाडी घेऊन झूडपात घेऊन उभा होता त्यावेळी एक लाल साडी नेसलेली तरुणी तिथे आली आणि त्याच्या बाईकवर बसून निघून गेली असे परिसरातील रहिवाशांनी त्याला सांगितले त्यानंतर झाला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने मुलीच्या घरच्यांना याप्रकरणी माहिती दिली असून दोन्ही बाजूचे कुटुंबीय सध्या त्यांचा शोध घेत आहेत.