बायको ‘ इतकी ‘ स्वच्छ राहते की नवऱ्याने मागितला घटस्फोट , अशी दिली उदाहरणे की ..

Spread the love

स्वच्छता ही तशी चांगली सवय मात्र कधी त्याचा इतका अतिरेक होतो की पती पत्नीत भांडणे देखील होतात. अशीच एक घटना बंगळुरू इथे समोर आली असून एका महिलेने चक्क या स्वच्छतेच्या नादापायी नवऱ्याचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन देखील पाण्यातून काढले. वारंवार सांगून बदल होत नसल्याने तिच्या या सवयीला नवरा वैतागला आणि त्याने आता चक्क घटस्फोटाचीच मागणी केली असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, पत्नी संध्या आणि पती गिरीश ( बदललेली नावे ) यांच लग्न 2009 साली झालं होत. लग्नानंतर नोकरीच्या निमित्ताने हे कपल इंग्लंडमध्ये गेलं. तेव्हा सर्व ठिक होतं भारतात आल्यावर आपली बायको जास्तच स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतेय हे त्याच्या ध्यानी येऊ लागलं. संध्याला स्वच्छतेची इतकी सवय लागली की घरातील प्रत्येक वस्तू ती साफ करू लागली आणि इतरांनाही तसंच करण्यास भाग पाडू लागली. तिच्या या विचित्र सवयीचा घरातील इतर सर्वांनाही त्रास होऊ लागला आणि भांडणे सुरु झाली.

लग्नानंतर दोन वर्षांनी पहिलं मूल झाल्यानंतर या कपलमधील परिस्थिती अधिक बिघडू लागली. कामावरून घरी येताच बायको नवऱ्याला दररोज बूट, कपडे आणि मोबाईल स्वच्छ करायला जबरदस्ती करायची. त्यामुळे नवरा कंटाळला आणि तिला दवाखान्यात घेऊन गेला तिथे संध्याला ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर असल्याचं सांगितलं जातं आहे. सदर आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती कोणतंही काम भीतीने किंवा आवेशाने वारंवार करत राहते. ब्रिटनहून पुन्हा भारतात परतताच या कपलने काऊन्सिलिंगची मदत घेतली आणि परिस्थिती काही काळ सुधारली त्यानंतर या दाम्पत्याने आणखी एका मुलाला जन्म दिला.

मात्र कोरोना आल्यानंतर संध्याची ओसीडीची समस्या अधिक वाढली. घरातील प्रत्येक वस्तू ती स्वच्छ आणि सॅनिटाइझ करू लागली पत्नीने त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल फोनही धुतला. पतीने दिलेल्या तक्रारीनुसार ती दिवसातून सहा पेक्षा जास्त वेळा अंघोळ करते आणि अंघोळीचा साबण स्वच्छ करायलाही देखील वेगळा साबण वापरते. अखेर बायकोच्या अति स्वच्छतेच्या सवयीला वैतागून नवऱ्याने घटस्फोट मागितला आहे.


Spread the love