लग्नाला काही तास बाकी असतानाच नवरदेवाला एक फोन आला अन ..

Spread the love

देशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून चक्क लग्नाच्या मांडवातून एका प्रेयसीने तिच्या प्रियकराला पळवून नेले . सदर घटना ही राजस्थानमधील जयपूर नजीक घडलेली असून लग्नाला काही तास उरले असताना तरुण मांडवातून गायब झाला. त्याचा सगळीकडे शोध घेतला असताना त्याच्या गायब होण्यामागील कारण पुढे आल्यावर पोलीस देखील चकित झाले आहेत .

उपलब्ध माहितीनुसार , राजस्थानच्या झुंझुनू भागात रवी कुमार नावाच्या तरुणाचं लग्न ठरलं होत आणि दोन्ही बाजूनी लग्नाची तयारी अगदी थाटामाटात केली देखील होती. काही वेळातच नवरदेवाला घेऊन वऱ्हाड येईल आणि थाटामाटात लग्न पार पडेल आणि आपल्या लाडक्या लेकीला आपण निरोप देऊ, अशा तयारीत वधूकडील मंडळी सज्ज असतानाच नवरदेवच गायब झाला . काही कारण सांगून तो दुचाकी घेऊन जो गेला तो परत आलाच नाही. भर मांडवातून गेलेला नवरदेव येईना म्हणून बराच काळ वाट पाहिल्यावर प्रकरण पोलिसात गेले.

पोलिसांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली असताना रवीचं त्याच्याच गावातील एका तरुणीवर प्रेम असल्याचे समोर आले आणि जर आता लग्न झाले तर आपली प्रेमकहाणी अपूर्ण राहिल, असं वाटून प्रेयसीने या प्रियकराला मांडवातून बाहेर बोलावून घेतले आणि त्याच दिवशी पळून जाण्याचा निर्णय घेतला. लग्नाला काही तास बाकी असतानाच प्रेयसीने त्याला बाहेर बोलावून घेतले आणि तो या तरुणीसोबत पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याला प्रेयसीसह हरियाणा येथून पकडून पुन्हा राजस्थान इथे आणण्यात आले आहे .


Spread the love