मोठी बहीण रागावली म्हणून तिचा राग धरून घरातून बाहेर पडलेला सहा वर्षाचा मुलगा ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापरामुळे सुखरूप घरी परतला . पारनेर तालुक्यातील पानोली घाट येथे ही घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सदर मुलगा हा पारनेर शहरातील रहिवासी आहे.
पारनेर शहरातील एक मुलगा सहा वर्षीय सहा वर्षे मुलगा बहिण रागावली म्हणून मनात राग धरून घरातून बाहेर पडला होता. पानोली घाटातून तो एकटाच चालला होता यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव यांनी त्याला त्याचे नाव विचारले मात्र मुलाने नाव सांगितल्यानंतर या नावाचे आपल्या गावात कोणीच नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती गावचे सरपंच शिवाजी शिंदे यांना सांगितली. सरपंचांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबर वरून ही माहिती आसपासच्या सर्व गावांना आणि पोलीस स्टेशनला कळवली.
पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या आदेशान्वये बीट अंमलदार रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल विवेक दळवी हे पानोली घाटात पोहोचले आणि अवघ्या काही मिनिटातच त्या मुलाच्या नातेवाईकांचे फोन यायला सुरुवात झाली, अखेर पोलीसनंतर त्या मुलाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि अवघ्या वीस मिनिटात त्याला सुखरूप घरी पोहोचवण्यात यश आले.
ग्रामसुरक्षा दल या नेटवर्कचा किती प्रभावी वापर होऊ शकतो हे या घटनेनंतर स्पष्ट झाले असून शासकीय यंत्रणेत लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे देखील या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. ग्रामसुरक्षा दल, पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे या यामुळे परिसरात या घटनेनंतर परिसरात कौतुक केले जात आहे.