पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेची तक्रार ‘ अजबच ‘, पोलिस म्हणाले डॉक्टरांना दाखवा

Spread the love

देशात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ इथे उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये एक महिला पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि तिने चक्क रोज आपल्या घरी दररोज भूत येतं आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतं, अशी तक्रार दिली आहे . विशेष म्हणजे ही महिला चांगली शिकली सावरलेली असून पेशाने इंजिनीअर आहे . तिची तक्रार लिहून घेण्यासाठी अधिकारी सज्ज झाले मात्र जेव्हा महिलेनं आपली कैफियत मांडायला सुरुवात केली, तेव्हा नेमकं काय करावं, हे त्यांनादेखील समजेना.

महिलेच्या म्हणण्यानुसार , आपल्या घरी भूत येतं आणि आपल्या घरातील अन्न फस्त करून जातं. रोज आपण आपल्यासाठी स्वयंपाक करुन ठेवतो, मात्र भूत येतं आणि आपण केलेला स्वयंपाक फस्त करून निघून जाते तसेच हे भूत पांढऱ्या रंगाचे कपडे घालून येतं आणि त्याचे उलटे पायदेखील आपल्याला दिसत असतात. आपण भुताशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते बोलत देखील नाही.

सदर उपद्रवी भूत आपल्या घरी यायला लागल्यापासून आपल्या अंगावरील सर्व दागिन्यांचं वजन देखील घटल्याचं तिनं सांगितलं आहे. आपण दागिने बाजारातून आणताना त्यांचं जे वजन होतं, ते आता राहिलं नसून दररोज थोडं थोडं वजन कमी होत आहे. तक्रारदार महिलेला मानसोपचारांची गरज असल्याचं पोलिसांनी ओळखलं आणि तिला एका मानसोपचार तज्ज्ञांकडे सोपवलं. त्यांच्याकडून उपचार घेतल्यानंतर महिलेला बरं वाटू लागेल आणि तिला होणारे भुतांचे भास थांबतील, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.


Spread the love